esakal | महाराष्ट्रातही शेतकरी आक्रमक; शरद पवारांची सोशल मीडियावरून साद
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar support farmers protest against farm law

केंद्र सरकारने घाईघाईत आणि कुणालाही विश्वासात न घेता मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरीदेखील एकवटले आहेत.

महाराष्ट्रातही शेतकरी आक्रमक; शरद पवारांची सोशल मीडियावरून साद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - केंद्र सरकारने घाईघाईत आणि कुणालाही विश्वासात न घेता मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरीदेखील एकवटले आहेत. 'संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा' या झेंड्याखाली राज्यातील १०० हून अधिक संघटना एकत्र आल्या असून मुंबईत २४ ते २६ जानेवारी रोजी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार देखील सहभागी होणार आहेत. २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला त्यांची उपस्थिती राहणार आहे.

तत्पूर्वी खासदार शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्चरला लावत  सोशल मीडियावर अभिनव पद्धतीने लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचा - लढणार आणि जिंकणारही...! हजारो शेतकऱ्यांची वाहन मोर्चाद्वारे मुंबईकडे कूच

खासदार शरद पवार यांनी ही फ्रेम लावल्यामुळे ग्रामीण भागातली तरुणाई उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी होत आहे. सोशल मीडियाचा वापर करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आंदोलन पोहचवण्याचा खासदार शरद पवार यांचा प्रयत्न आहे. 

दिल्ली येथील आंदोलनाला ५० हून अधिक दिवस लोटले आहेत, तरीही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत. कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने देखील पाठिंबा दिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून सत्तेतील तीनही पक्ष या आंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत. 

हे वाचा - शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?

सोमवार, २५ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या सभेला खासदार शरद पवार संबोधित करणार आहेत. दिल्लीतील आंदोलनाला सोशल मीडियावरून सामान्य जनतेचा पाठिंबा लाभला आहे, तसाच पाठिंबा राज्यातूनही मिळावा यासाठी शरद पवार यांच्याकडून सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आले आहे.

loading image