शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

शेतमाल, दुधाची नासाडी नको
शेतकरी आंदोलनांमध्ये अनेक ठिकाणी शेतमाल व दुध रस्त्यार फेकून देण्यात येत आहे. अशा सर्वांना आंदोलनामध्ये दुध, शेतमाल रस्त्यावर न टाकण्याची विनंती पवार यांनी केली. शेतकऱ्यांचा आक्रोश दाखविण्यासाठी गरीब मोहल्ल्यांमद्ये दुधाचे वाटप करावे. यामुळे कष्टाने कमविलेल्या शेतमालाची नासाडी होणार नाही.

मुंबई : सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. या सरकारची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना, मुख्यमंत्र्यांकडून साम, दाम, दंड भेदाचा वापर केला जात आहे. माझा शेतकरी म्हणून या शेतकरी संपाला पाठींबा असल्याचे पवार म्हणाले.

देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी आंदोलने सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. या आंदोलनांमध्ये अनेक ठिकाणी शेतमाल, दुध रस्त्यावर फेकून विरोध दर्शविण्यात येत आहे. एवढ सर्व सुरू असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. अनेक मंत्र्यांकडून शेतकरी आंदोलनांविषयी असंवेदनशील विधाने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

शेतमाल, दुधाची नासाडी नको
शेतकरी आंदोलनांमध्ये अनेक ठिकाणी शेतमाल व दुध रस्त्यार फेकून देण्यात येत आहे. अशा सर्वांना आंदोलनामध्ये दुध, शेतमाल रस्त्यावर न टाकण्याची विनंती पवार यांनी केली. शेतकऱ्यांचा आक्रोश दाखविण्यासाठी गरीब मोहल्ल्यांमद्ये दुधाचे वाटप करावे. यामुळे कष्टाने कमविलेल्या शेतमालाची नासाडी होणार नाही.

Web Title: Sharad Pawar talked about farmer agitation