वंचितांवर अन्याय करणारे बाजूला ठेवा - शरद पवार

सातारा - अरुण खोरे यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार गुरुवारी प्रदान करताना शरद पवार. त्या वेळी शेजारी सुप्रिया सोळांकुरे, अजित पवार.
सातारा - अरुण खोरे यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार गुरुवारी प्रदान करताना शरद पवार. त्या वेळी शेजारी सुप्रिया सोळांकुरे, अजित पवार.

सातारा - आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. पण, लक्ष्मण माने वंचित समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचले. वंचितांसाठी झटणाऱ्या सत्प्रवृत्ती समाजात आहेत, तोपर्यंत लक्ष्मण मानेंनी आपले कार्य पुढे सुरू ठेवावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी दिला.

जकातवाडी (ता. सातारा) येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात आज फुले-आंबेडकर साहित्य पंचायत, भटक्‍या विमुक्त जमाती संघटना व भारतीय भटके, विमुक्त संशोधन संस्थेच्या वतीने दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार पत्रकार अरुण खोरे, जीवन गौरव पुरस्कार अंकुश काळे यांना तसेच युवा साहित्य पुरस्कार सुप्रिया सोळांकुरे यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

पवार म्हणाले, ‘‘वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धीची अपेक्षा नसते. या घटकांचे भले होण्यातच त्यांना समाधान असते. त्यासाठी कोणी लेखणीतून तर कोणी साहित्यातून तर कोणी प्रत्यक्ष काम करून आपल्या भावना रेखांकित करतात.’’ 

खोरे म्हणाले, सर्व चळवळीत एका व्यक्‍तीवर कायम अन्याय झाला आहे. ते म्हणजे महात्मा गांधी. गांधीजींना चळवळींशी जोडा. त्यांना अस्पृश्‍य म्हणून ठेवू नका. त्यासाठी वैचारिक सांधेजोड झाली पाहिजे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com