पवारांकडून प्रकाश आंबेडकरांना चुचकारण्याचा प्रयत्न

पवारांकडून प्रकाश आंबेडकरांना चुचकारण्याचा प्रयत्न

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शरद पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आमची बोलणीही चालू असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

त्याचबरोबर, पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची भूमिका स्पष्ट आहे, संघाच्या विचारधारेला आमचा विरोध असल्यामुळे प्रकाश आंबेडकरांना कुठलीही अडचण नसावी. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही आम्ही सोबत घेणार असून भाजपविरोधी विचारांची मोट बांधून आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

दरम्यान, कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले होते की, आंबेडकरजी, आरएसएसला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे याचा मसुदा आपण द्या, महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेली भूमिका अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com