
Sharad Pawar : 'तो' फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने शरद पवार नाराज; प्रफुल्ल पटेल म्हणाले...
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये होते. गौतम अदानी यांच्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरीदेखील लावली. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत भाष्य केलं. तसेच संसदेच्या उद्घाटनावेळीचा सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यावरून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया आली आहे.
दिल्ली येथील नवीन संसदीय इमारतीच्या उद्घाटनाच्याप्रसंगी प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबतता फोटो ट्विट केला होता. त्यावर प्रफुल पटेल म्हणाले की, पवार साहेब हे माझ्यासाठी आदरणीय आणि वंदनीय आहेत. त्यांच्यासोबत मी नवीन संसद भवनात प्रवेश करत असताना एक आठवण म्हणून त्यांच्यासोबत फोटो काढलेला आहे. स्मरणात राहावा म्हणून तो फोटो काढलेला आहे. त्याचा कोणीही राजकीय अर्थ घेऊ नये असही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
शरद पवार-गौतम अदानी भेटीवर पटेल् म्हणाले की, अदानी हे माझे सुद्धा मित्र आहेत. ते राजकीय व्यक्ती नाहीत. त्यामुळे अशी भेट होणे हे वावगे नाही. त्याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये असही पटेल म्हणाले.