पवार यांच्यासोबतची मैत्री ग्रामीण विकासामुळे - नायडू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

बारामती शहर - ‘‘माझ्या राजकीय प्रवासाच्या प्रारंभापासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे वेगळे संबंध आहेत. आमचे राजकीय विचार वेगळे असले; तरी ग्रामीण विकासाबाबत त्यांचे प्रेम, त्यांचा प्रॅक्‍टिकल दृष्टिकोन व सतत ज्ञान संपादन करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे आमची मैत्री कायमच राहिली,’’ अशा शब्दांत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शरद पवार यांच्याशी असलेल्या स्नेहसंबंधांची मोकळेपणाने कबुली दिली. 

नायडू यांनी बारामतीत पत्रकारांसमोर बोलताना, गेल्या चाळीस वर्षांपासूनच्या राजकीय प्रवासात आमचे पक्ष वेगळे असले; तरी स्नेहसंबंध कायमच राहिल्याचा उल्लेख केला. उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच बारामती भेट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही पवार यांची स्तुती करत त्यांच्या ग्रामीण विकासाच्या कामाची माहिती प्रत्येक खासदाराने बारामतीत येऊन घ्यायला हवी, अशी पावतीही दिली. 

गेल्या चार दशकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा झालेला सर्वांगीण विकास पाहून मी प्रभावित झालो, असे सांगत उपराष्ट्रपतींनी शरद पवार यांच्या व्हीजनचे कौतुक केले. 

विद्या प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्थांच्या माध्यमातून या भागाचा झालेला कायापालट हा सामान्य माणसाच्या जीवनात आनंद फुलविणारा असल्याने हा विकास पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी नमूद केले. बारामतीचा विकास पाहण्याची माझीच इच्छा होती. दोन दिवस पुण्यात होतो. त्यामुळे शरद पवार यांनी हा योग जुळवून आणला, असे सांगत त्यांनी त्यांच्याबद्दल आभार व्यक्त केले.

Web Title: sharad pawar venkaiah naidu friendship rural development