Sharad Pawar : शरद पवार करणार देशातल्या विरोधकांचं नेतृत्व?; नितीश कुमार म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Nitish Kumar

Sharad Pawar : शरद पवार करणार देशातल्या विरोधकांचं नेतृत्व?; नितीश कुमार म्हणाले...

मुंबईः जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. भेटीनंतर उभय नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आहे.

शरद पवार आणि नितीश कुमार यांनी एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेतून विरोधकांच्या एकजुटीची हाक दिली आहे. देशामध्ये विरोधकांनी एकत्र राहिलं पाहिजे, तर लोकशाही जिवंत राहिल. भाजपने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केल्याचं त्यांनी सांगितलं.

शरद पवार म्हणाले की, आजच्या घडीला विरोधकांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना निर्णय घ्यावा लागेल. भाजपककडून सातत्याने सत्तेचा गैरवापर होत आहे. देशात विरोधकांच्या आघाडीची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

नितीश कुमार म्हणाले की, भाजप देशहिताच्या विरोधात काम करत आहे. शरद पवार हे विरोधकांचा चेहरा झाले तर आनंदच आहे. देशात महाआघाडी करण्याचा आमचा विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे भविष्यात विरोधकांची एकत्र मोट बांधली तर शरद पवार हे नेतृत्व करतील, असंच आजच्या नितीश कुमारांच्या भेटीतून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarnitish kumar