मी अजून हरलो नाही,' शरद पवारांची भावनिक पोस्ट

मी अजून हरलो नाही,' शरद पवारांची भावनिक पोस्ट

पुणे : "थकलो आहे जरी, मी अजून झुकलो नाही. जिंकलो नसलो, तरी अजून मी हरलो नाही ,'' अशी इन्स्टाग्रामवर भावनिक पोष्ट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचा दिलासा दिला. पवार यांच्या या पोष्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक प्रवास पवार यांनी केला. सर्वाधिक सभादेखील त्यांनीच घेतल्या. वयाच्या अठ्ठ्यातराव्या वर्षी त्यांच्यातील उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे. निवडणुकीच्या प्रचाराची सुरवातदेखील सर्वात आधी पवार यांनीच केली. या साऱ्या प्रचाराच्या झंजावाताच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. 

परिणामी कार्यकर्त्यांमध्ये निराशेची भावना निर्माण झाली आहे. ही भावना झटकून पुन्हा नवा उत्साह निर्माण करण्यासाठी पवार यांचे हे शब्द पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणार आहेत. स्वत: पवार यांनी निवडणुकीतील पराभवाचा विचार झटकून सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावांचा दौरा सुरू केला आहे. पवार यांनी आज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्‍यातील दुष्काळी गावांना भेटी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com