शरद पवार यांचा सोलापुरात 24 एप्रिलला होणार नागरी गौरव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सोलापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने पवार यांचा सोमवारी (ता. 24) नागरी सत्कार होणार आहे. येथील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सत्कार समिती अध्यक्ष आमदार दिलीप सोपल यांनी दिली. 

विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पवार यांचा सत्कार होणार आहे. पवार व सोलापूरचे गेल्या अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे नाते आहे. सोलापूरचे पालकमंत्री माढ्याचे खासदार व केंद्रीय कृषिमंत्री म्हणून पवार यांनी केलेले कार्य आजही उल्लेखनीय आहे. पन्नास वर्षे विधिमंडळ व संसदेत अविरत काम करणारे शरद पवार हे देशातील एकमेव नेते आहे, असे सोपल यांनी सांगितले. 

Web Title: Sharad Pawar's glory will be on April 24 Solapur