शरद पवार यांचा "विद्यार्थी संवाद' 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षबांधणीची मजबूत तयारी म्हणून "विद्यार्थी संवाद' असा कार्यक्रम आखला असून, पुढील महिन्यात प्रत्येक जिल्ह्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेसोबत ते स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. 

सध्या "राष्ट्रवादी'ची विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्षांच्या नियंत्रणाखाली सुरू असली, तरी स्वत: शरद पवार थेट विद्यार्थी संघटनेसाठी वेळ देणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. विद्यार्थी "राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी दुष्काळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफीचे यशस्वी आंदोलन केले. त्याशिवाय विद्यापीठ उपकेंद्राच्या निर्मितीबाबत "राष्ट्रवादी' विद्यार्थी संघटनेचे आंदोलन प्रभावी ठरले. पक्षाच्या पराभवाची परंपरा कायम असताना विद्यार्थी संघटनेचे परिणामकारक कार्य पाहून आगामी काळात नव्या नेतृत्वाचे चेहरे विद्यार्थी "राष्ट्रवादी'तच शोधण्याचा हा मार्ग असल्याचे मानले जात आहे. 

प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नेतृत्वाचे गुण दाखवत शरद पवार यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. 

Web Title: Sharad Pawar's student interaction