शिवेंद्रराजेंच्या फेसबुक पेजवरील पवारांचा उल्लेख बदलला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर पवारांचा उल्लेख जाणता राजा असा केला होता. तो आता एडिट करून लोकनेते असा करण्यात आला आहे.

पुणे : महिनाभरापूर्वी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना साताऱ्याचे छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर पवारांचा उल्लेख जाणता राजा असा केला होता. तो आता एडिट करून लोकनेते असा करण्यात आला आहे. सध्या हे सोशल मीडियाव मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. छत्रपती शिवेंद्रराजे यांचे हे अधिकृत फेसबुक अकाऊंट नसले तरी यावरून उलटसुलट चर्चा चालू आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. यानंतर मोठा वाद झाला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा जाणता राजा म्हणून होत असलेल्या उल्लेखावरही अनेकांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर काही शिवेंद्रराजेंनी पवारांचा जाणता राजा असा केलेला उल्लेख एडिट केला आहे. आज (ता.१४) छत्रपती उदयनराजे यांनीही पत्रकार परिषद घेऊन जाणता राजा हे एकमेव शिवाजी महाराज होते असे म्हणत पवारांवर निषाणा साधला होता.

छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

शिवेंद्रराजे यांनी १२ डिसेंबर २०१९ रोजी शरद पवार यांच्या वाढदिवशी जाणता राजा आदरणीय मा. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अशा आशयाची पोस्ट केली होती. ती आज लोकनेते आदरणीय मा. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. अशी एडिट केली आहे.

Image may contain: 1 person, text

तत्पूर्वी, भाजपनेते जय भगनवान गोयल यांनी हे पुस्तक लिहले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते, यानंतर या पुस्ताकाचा आणि भाजपचा कसल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawars title name Changed on Shivendra Rajes Facebook page