रिपब्लिकनला सत्तेत  हवा पाच टक्के वाटा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - राज्यातील सत्तेत रिपब्लिकन पक्षाला पाच टक्के वाटा मिळावा, अशी मागणी या पक्षाने मित्रपक्षांकडे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक जागा सोडाव्यात, राज्यात प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत प्रत्येकी एक राखीव जागा सोडावी, अशी मागणीही केली आहे; अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. 

राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मित्रपक्षांनी सन्मानपूर्वक सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेशी महायुती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जेथे शिवसेना-भाजप युती होणार नाही, तिथे भाजपसोबत युती करण्यात येईल; मात्र निवडणूक केवळ मित्रपक्षांवर अवलंबून न राहता रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर जिंकण्याची तयारी करावी, असे आवाहनही पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

Web Title: The share of five per cent of RPI