'शिव वडापाव 12 रुपयांना विकला जातोय, तिकडे लक्ष द्या!' : शर्मिला ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

शिवसेनेवर राजकीय भाष्य करणे टाळणाऱ्या शर्मिला ठाकरे यांनी मात्र टोकदार उत्तर देत परतफेड केली आहे. 

मुंबई : 'विरोधी पक्ष बनण्याची मागणी करणारे पुढच्या निवडणुकीत पेपर वाचण्यासाठीच शिल्लक राहतील,' अशा शेलक्‍या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा समाचार घेतला.

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी प्रचार सभेत केलेल्या वक्‍तव्यावर शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया आल्यानंतर काही तासांतच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी शिवसेनेच्या दहा रुपयांत थाळी देण्याच्या आश्‍वासनाची खिल्ली उडवत शिववडा-पाव 12 रुपयांना विकला जातोय, याकडे लक्ष वेधत परतफेड केली आहे.

- Vidhan Sabha 2019 : 'सर्वकाही शिवसेना आमदारांचे संख्याबळ वाढविण्यासाठीच!' : आदित्य ठाकरे  

आडूनआडून एकमेकांना टोले लगावणारे शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष या विधानसभा निवडणुकीत मात्र थेट आमनेसामने येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विरोधी पक्षाची सत्ता मिळावी असे वक्‍तव्य राज ठाकरे यांनी प्रचारसभेत केले होते.

त्यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना उद्धव ठाकरे यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत मनसेचे अस्तित्व तरी राहील का? अशा आशयाचे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर राज हे प्रचारसभेत बोलण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेवर राजकीय भाष्य करणे टाळणाऱ्या शर्मिला ठाकरे यांनी मात्र टोकदार उत्तर देत परतफेड केली आहे.

- Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक

आर्थिक गैरव्यवहारांमुळे निर्बंध लादण्यात आलेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर सध्या निर्बंध आहेत, त्यामुळे खातेदार हवालदिल झाले आहेत. कुणाला मुला-बाळांची लग्नकार्ये पुढे ढकलावी लागली आहेत, तर कुणाला दागिने गहाण ठेवून जगण्याची वेळ आली आहे.

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत हा मुद्दा लावून धरला आहे. प्रत्येक सभेत पीएमसी बँक गैरव्यवहारावरून राज ठाकरे सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरत असून, पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर भाजपचेच नेते असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत.

- स्वीडिश नागरिकाचा विमानतळावर नग्नावस्थेत दंगा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharmila Thackeray criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray