'शरद पवार आमचे श्रद्धास्थान; कारवाई करू नका' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

येथे झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाई करू नका, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत, अशी मागणी त्यांनी केली. 

नवी मुंबई : येथे झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाई करू नका, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत, अशी मागणी त्यांनी केली. 

दरम्यान, अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत आज (बुधवार) झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. याच कार्यक्रमात अनेक पक्षांचे नेते एकत्र आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजप-सेनेची युती होणार असल्याचे भाष्य केले. हे व्यासपीठ राजकीय होऊ देऊ नका, तसेच आमचे सरकार कामगारांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीचेच सरकार येणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, कामगारांशी प्रमाणिक असणारे नेते हवेत. कामगारांना हक्काचे घर मिळायलाच हवे. नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे हेच खरे कामगारांचे खरे नेते आहेत. नेतृत्व चुकले तर कामगार चळवळ देशोध़डीला लागेल.  

याच सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर सभेतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कारवाई करू नका पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यावर होणारी कारवाई चुकीची असेल तर कारवाई त्वरीत थांबवा, असे ते म्हणाले. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या धर्तीवर शिंदे यांची माथाडी कामगार मेळाव्यादरम्यान जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ही मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashikant Shinde warned government on ed case filed agianst Sharad Pawar