महाराष्ट्रात शिक्षक भरतीची 'पवित्र' सुरवात महिनाभरात

बुधवार, 6 जून 2018

पुणे : शिक्षक भरतीमधील गैरप्रकार रोखणारे राज्य सरकारचे 'पवित्र पोर्टल' या महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे. खासगी शिक्षण संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती याच प्रणालीद्वारे होणार आहे.

संस्थाना रिक्त जागांनुसार भरतीच्या जाहिराती देखील एकाचवेळी प्रसिद्ध करावी लागेल. 
शिक्षकांची शाळांमध्ये होणारी नियुक्ती गुणवत्तेच्या आधारे व्हावी म्हणून राज्य सरकारने अभियोग्यता आणि बुद्धिमता चाचणी घेतली होती. त्याची गुणवत्ता यादी देखील तयार आहे.

मात्र पवित्र पोर्टल म्हणजेच 'पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टिचर्स रिक्रूटमेंट' कधी सुरू होणार, शिक्षकभरती कधी होणार, याबाबत स्पष्टता नव्हती. शालेय शिक्षण विभागाकडे इच्छुक उमेदवारांकडून वारंवार विचारणा केली जात होती. या संकेतस्थळाचे काम पूर्ण झाल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. 

#शिक्षकभरती याविषयी अधिक माहिती वाचा उद्याच्या (गुरुवार) 'सकाळ'मध्ये!

Web Title: shikshak bharti in Maharashtra to start within a month