शिक्षकभरती वरून भावी शिक्षकांचा ट्विटरवर सरकार विरोधात संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

राज्यात एकूण 24 हजार शिक्षकांची रिक्त पदे, मागील आठ वर्षापासून न झालेली शिक्षक भरती यामुळे अस्वस्थ झालेल्या भावी शिक्षकांनी ट्विटरवर सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. #शिक्षकभरती या हॅश टॅग खाली ट्विटरवर ट्विटचा पाऊस पाडला आहे. बहुसंख्य लोकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

पुणे - राज्यात एकूण 24 हजार शिक्षकांची रिक्त पदे, मागील आठ वर्षापासून न झालेली शिक्षक भरती यामुळे अस्वस्थ झालेल्या भावी शिक्षकांनी ट्विटरवर सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. #शिक्षकभरती या हॅश टॅग खाली ट्विटरवर ट्विटचा पाऊस पाडला आहे. बहुसंख्य लोकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. केवळ घोषणांचा पाऊस पाडणारे सरकार शिक्षक भरती नक्की कधी करणार, की शिक्षक भरती हे केवळ दिवास्वप्न आहे असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. 
शिक्षकभरती साठी आवश्यक असणारी टीईटी सारखी पुर्व परिक्षा पास करूनही नोकरी मिळत नसल्याने तरुण निराश झाले आहेत. आपली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ट्विटरचा मार्ग निवडला.   

- कुणी निंदा, कुणी वंदा, दिशाभूल करणे हाच आमचा धंदा... 

- मतदान घेता दिवाळी, रोजगार देता शिमगा...

- सारा भ्रष्टाचाराचा मामला, पवित्र पोर्टचा मुहूर्त कशाने थांबला...

- जळत्या घराचा पळता वासा, तरुणांच्या गळ्या भोवती बेरोजगारीचा फासा...
असे अनेक उपरोधात्मक ट्विट अनेकांनी केले आहे. 

Web Title: #shikshakbharti youth open on twitter