CBI साठी महाराष्ट्राचे दार मोकळे, शिंदे सरकारचा मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI

CBI साठी महाराष्ट्राचे दार मोकळे, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारला आता आणखी धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने सीबीआयला येण्यासाठी दार बंद केले होते. पण आता शिंदे सरकारने सीबीआयसाठी दार मोकळे केले आहे. (Shinde govt revokes denial of general consent for CBI, now the central agency won't need permit to file cases)

शिंदे-फडणवीस सरकारने सीबीआयला महाराष्ट्रात चौकशीसाठी गरजेची ‘जनरल कॅसेन्ट’ पुन्हा बहाल केली आहे. आता सीबीआयला चौकशीसाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी काढून घेतली होती. त्यामुळे सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला चौकशी करू शकत नव्हती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सीबीआय आता कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतं.