Ashok Chavan: शिंदे गटाच्या मंत्र्याचे मोठे वक्तव्य; अशोक चव्हाण लवकरच...

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पक्षातून इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू
Ashok Chavan
Ashok ChavanEsakal

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पक्षातून इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू झालं. हे इनकमिंग आणि आऊटगोइंग अजूनही सुरूच आहे. मग ते शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर असो किंवा राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे असोत किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असोत यांच्या दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.

अशातच गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र अशोक चव्हाण यांनी या फक्त अफवा असल्याचा खुलासा केला होता. मात्र आता शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केलंय. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची कुजबुज सुरु असून, चव्हाण यांचे समर्थक असलेल्या आमदारानेच आपल्याला ही माहिती दिली असल्याचंही अब्दुल सत्तार म्हणालेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

Ashok Chavan
Nanded : ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हावे; अशोक चव्हाण

औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर बोलतांना सत्तार म्हणाले , अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार राजूरकर यांच्याकडे मी याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी चव्हाण भाजप प्रवेशाची कुजबूज सुरू असल्याचा राजूरकर यांनीच मला सांगितले असल्याचं सत्तार म्हणाले.

Ashok Chavan
Nanded : अशोक चव्हाणांच्या पक्षांतर चर्चेला पूर्णविराम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com