Shinde vs Thackeray: राज्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; मागील सुनावणीत काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde vs Thackeray:

Shinde vs Thackeray: राज्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; मागील सुनावणीत काय घडलं?

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. परंतु वकिलांनी आणखी वेळ मागितल्याने आज ते युक्तिवाद करणार आहेत.(Shinde vs Thackeray Supreme Court Hearing ShivSena Harish Salve Kapil Sibal maharashtra politics)

शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे आज युक्तिवाद करतील. तसेच राज्यपालांच्या वतीने सॉलिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत.

मागील सुनावणीत काय घडलं?

मागील सुनावणी २ मार्च झाली होती. यावेळी सुनावणी केवळ २ तासांत संपली. २ मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी संपणार हे जवळपास निश्चित होते. सरन्यायाधिशांनीही तसे संकेत दिले होते. परंतु ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. त्यामुळे सुनावणीला नवं वळण लागलं.

हेल्थ वेल्थ : वजन कमी करण्यासाठी...!

शिंदेंच्या वकिलांनी कोर्ट गाजवलं होतं. यावेळी शिंदे गटाचे वकील निरश किशन कौल यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला.

उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर साळवे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी घेण्याला काही अर्थ नाही, असे साळवे यावेळी म्हणाले होते. केवळ १६ आमदार अपात्र ठरवले गेले तोच मुद्द न्यायालयासमोर असल्याचे साळवे म्हणाले.

उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर कदाचित त्यांच्या आघाडीतील एखाद्या पक्षाने त्यांची साथ सोडली असती, काहीही होऊ शकले असते? असा सवाल देखील उपस्थित केला. या युक्तीवादामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबली.

राज्यपालांसमोर पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेने बहुमत चाचणीसाठी बोलावले. एकनाथ शिंदे बहुमत चाचणीत बहुमत मिळवण्यात यश आले, असे देखील हरिश साळवे म्हणाले होते.

शिवसेनेत बंड होऊन राज्यात सत्ता बदल झाला. हा सत्ता बदल बेकायदेशीर असून या बाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गेल्या ७ महिन्यांपासून या बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडली. या सत्ता संघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टी आधीच पूर्ण करण्याचा घटनापीठाचा इरादा होता. पण युक्तिवाद लांबल्यामुळे ती पूर्ण होऊ शकली नव्हती. मात्र, आज या संदर्भात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray