नेत्यांनी आपले जिल्हे सांभाळावेत - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

शिर्डी - 'गुजरातच्या निवडणुकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळे तेथे कॉंग्रेसने आजवरची सर्वाधिक चांगली कामगिरी केली. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे अनुकूल पडसाद उमटतील. आगामी काळात नेत्यांना आपापले जिल्हे सांभाळावेच लागतील. माझ्या जिल्ह्यात मी व माझा पक्ष कुठे आहे, यावर कॉंग्रेस नेत्यांचे स्थान ठरेल,'' असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केले.

चव्हाण यांनी आज येथे येऊन साईदर्शन घेतले. चव्हाण म्हणाले, 'राज्याच्या मागील विधानसभा निवडणुकीत आमच्या काही चुका झाल्याने पराभव झाला. गुजरातच्या तुलनेत राज्यात कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. या पुढील काळात आम्ही मेहनत घेऊ. पक्षाच्या नेत्यांनी आपापले जिल्हे सांभाळावेत. आधी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवा. तेथे तुम्ही कोठे आहात यावर नेत्यांचे स्थान ठरेल. हेच आमचे या पुढील धोरण असेल. कॉंग्रेस सर्वसमावेशक व धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. त्यामुळे गुजरातेत आम्ही सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतला, असे म्हणता येणार नाही. विकास हा मूळ अजेंडा आमचाच आहे. त्याआधारेच आम्ही पुढे जात राहू.''

Web Title: shirdi maharashtra news ashok chavan talking