सोन्याच्या आमिषातून 50 लाखांना लुटले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

शिर्डी - खोदकामात पाच किलो सोन्याची नाणी सापडल्याचे आमिष दाखवून दिल्ली येथील एकास 50 लाखांना लुटल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

शिर्डी - खोदकामात पाच किलो सोन्याची नाणी सापडल्याचे आमिष दाखवून दिल्ली येथील एकास 50 लाखांना लुटल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

याबाबत दिल्ली येथील इंद्रकुमार बक्षी यांनी रविवारी (ता.24) फिर्याद दिली. त्यानुसार पाच जून रोजी साईमंदिराच्या महाद्वार क्रमांक दोनजवळ आरोपी विनोद (पूर्ण नाव समजले नाही) व त्याचे दोन साथीदार बक्षी यांना भेटले. "खोदकाम करताना आम्हाला पाच किलोची सोन्याची नाणी सापडली असून, आम्ही ती 50 लाख रुपयांत देऊ,' असे आमिष त्यांनी दाखविले. पुढील सहा दिवस त्यांच्यात बोलणी सुरू होती. विश्‍वास बसण्यासाठी आरोपींनी एक नाणे तपासण्यासाठी बक्षी यांच्या हवाली केले. ते सोन्याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 11 जून रोजी 50 लाख रुपये घेऊन घोटी येथे येण्यास आरोपींनी त्यांना सांगितले. तेथे गेल्यानंतर आरोपींनी सोन्याऐवजी पितळेचीच नाणी बक्षी यांच्या हवाली केली. त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील 50 लाख रुपयांची रक्कम हिसकावून तिघे आरोपी पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर तपास करीत आहेत. 

Web Title: shirdi news 50 lakhs of gold looted

टॅग्स