‘चुकीचे वागलात, तर जनता माफ करणार नाही’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

शिर्डी - ‘‘जनतेने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून भारतीय जनता पक्षाकडे सत्ता दिली. त्यांची नक्कल करून आपण कारभार केला, तर लोक आपली गय करणार नाहीत. भाजपची सत्ता घालविण्याची धमक विरोधी पक्षांत नाही; पण भाजपचे कार्यकर्ते चुकीचे वागले, तर जनता माफ करणार नाही.’’ असा सल्ला अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट 
यांनी आज कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दिला.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक आज येथे सुरू झाली. त्या वेळी बापट बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राजकारण ही लांब पल्ल्याची लढाई असते. येथे पडून राहावे लागते. पक्षाला गरज म्हणून कधी कधी आयाराम-गयारामांना जवळ करावे लागते.’’

Web Title: shirdi news girish bapat bjp