Hat-trick of Good News; समृद्धी, वंदे भारतनंतर साईभक्तांना मिळाली मोठी बातमी

शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी
 Hat-trick of Good News; समृद्धी, वंदे भारतनंतर साईभक्तांना मिळाली मोठी बातमी

शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिर्डीत नाईट लँडिंगची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची काकड आरतीची इच्छा पूर्ण होणार आहे. समृद्धी, वंदे भारतनंतर साईभक्तांना मोठी बातमी मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाईट लँडिंगसाठी पाठपुरवठा करता होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. आज सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.

 Hat-trick of Good News; समृद्धी, वंदे भारतनंतर साईभक्तांना मिळाली मोठी बातमी
Ajit Pawar: कॅमेरे बघताच अजित पवारांनी ठोकली धूम; काय आहे कारण?

गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला आणि आज सकाळी डीजीसीएकडून हा परवाना प्राप्त झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आणखी एक भर विकासात घातली आहे. शिर्डी विमानतळ देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 2017 मध्ये सुरु झाले होते.

 Hat-trick of Good News; समृद्धी, वंदे भारतनंतर साईभक्तांना मिळाली मोठी बातमी
Shinde Vs Thackeray: तुमच्या सुप्रीम कोर्टात बैठका झाल्यात का...त्या दाव्यावरुन सेनेच्या बड्या नेत्याचा सवाल

शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com