‘साई संस्थानचे कर्ज कशासाठी?’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई - सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत म्हणूनच सरकार २० हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर खर्च करायला तयार आहे. मग सरकार ५०० कोटी रुपये एखाद्या संस्थानकडे मागते हे हास्यास्पद असून, सरकारची आर्थिक विश्वासार्हता किती कमी झाली आहे, हे यावरून दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पुरवणी मागण्यांसाठी तरतूद असताना साई संस्थानचे कर्ज कशासाठी, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

साई संस्थानकडून सरकारने ५०० कोटींचे कर्ज घेतले आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली. एखाद्या संस्थानकडून बिनव्याजी पैसे घेण्याची वेळ जर सरकारवर आली असेल, तर सरकारची आर्थिक अवस्था अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. हे सरकार निधी खर्च करायला तयार नाही, त्यामुळे सिंचनाचे सर्व प्रकल्प ठप्प आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले.

Web Title: Shirdi Sai Sansthan to give 500 Cr loan to Maharashtra government