esakal | नाना पटोलेंच्या 'स्वबळावर' मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole uddhav thackeray

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात उर्चांना उधाण आलं आहे.

नाना पटोलेंच्या 'स्वबळावर' मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात उर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवल्याचं गंभीर वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन त्यांनी नंतर यूटर्न घेतला. नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचा सातत्याने नारा दिला आहे. या त्यांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मिश्किल टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं. बाळासाहेब थोरात यांच्याकडे 'स्वबळावर' जेवायला येऊ, असं ते म्हणाले. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जलभूषण पुरस्काराने सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणजे सरकारमधील सर्व मंत्री चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. तसेच सरकारमध्ये फक्त मंत्री येत नाहीत. यात सचिव, अधिकारी सर्वजण आले. आपण जे काही करतोय त्यातून हवं ते मिळत असेल तर समाधान मिळतं. अजित पवार यांनी जेवनाचा विषय काढला. त्यात बाळासाहेब थोरात म्हणाले की कोरोनामुळे ते जमलं नाही. तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, कोरोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे 'स्वबळावर' जेवायला येऊ, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांच्या या टिप्पणीनंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. याचा अर्थ वेगळा समजू नका, स्वबळावर म्हणजे कोरोनाची भीती न बाळगता असं मला म्हणायचं आहे. नाहीतर जेवणावरुन आघाडीत बिघाडी बातमी यायची, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा: फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

इतकी वर्षे जी माझी राजकीय कारकीर्द राहिलीये ती जनते समोर आहे. माझी राजकीय कारकीर्द काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्याविरोधातील आहे. जे काही कानावर पडलं ते राजकीय मतभेदाचं पडलं होतं. पण, याचा अर्थ असा नाही की, विरोधक होतो म्हणून तुम्ही जे केलंय ते सर्वच वाईट. ही भूमिका शिवसेना किंवा शिवसेना प्रमुखांची कधीही नव्हती, असंही ते कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

loading image