केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांचे  शनिदर्शन

सुनिल गर्जे
रविवार, 24 जून 2018

नेवासे : केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आज सहकुटुंब श्री क्षेत्र शिंगणापूरला शनिदेवाचे दर्शन घेतले. केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या भेटीनंतर लगेचच रविशंकर प्रसाद यांची भेट ही महत्वाची मानली जात आहे. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात सहकुटुंब शनी अभिषेक केला. देवस्थानच्या सुविधांची माहिती घेतली. 

जागतिक दर्जाच्या या देवस्थानमध्ये अजून सुविधा व्हायला पाहिजे व त्यासाठी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी त्यांना केली. भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी स्वागत केले. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, निरंजन डहाळे, सयाजी शेटे, बाळासाहेब कुऱ्हाट, अनिल शेटे, महेंद्र आगळे, बंडू शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Shishadarshan of Union Minister Ravi Shankar Prasad