युतीचे सूर बेसूरच!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीतील शिवसेना आणि भाजपदरम्यानची जागावाटपाची हालचाल पूर्णपणे थंडावली असून, दोन्ही पक्षांनी स्वबळावर वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे युतीचा पोपट मेल्यात जमा असून फक्‍त ते कोणी जाहीर करायचे, हाच प्रश्‍न उरला असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून घडत असलेल्या या दोन्ही पक्षांतील राजकीय घडामोडींवरून निर्माण झाले आहे.

या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जागावाटपाच्या तीन बैठका पार पडल्या. त्यानंतर ताकद वाढली आहे, असे कारण पुढे करीत भाजपने निम्म्या जागांवर हक्‍क सांगितला, तर शिवसेनेने 60 जागांचा प्रस्ताव देऊन भाजपची खिल्ली उडवली. दोन्ही बाजूंनी चर्चा थांबवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच युतीबाबत निर्णय घेतील, असे दोन्ही पक्षांच्या वतीने जाहीर केल्यानंतर आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मंत्री प्रकाश महेता, मंत्री विनोद तावडे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या भूमिकेविषयी चर्चा करण्यात आली. शिवसेनेकडून समाधानकारक प्रस्ताव येणार नसेल, तर स्वबळावर लढणे फायदेशीर ठरणार आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेचा "वचननामा' जाहीर करून स्वबळावर लढण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यामुळे युती होणार नाही, हे कोणी सांगायचे हा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे.
भाजपकडून युतीसाठी प्रचंड आशावादी असल्याचे सांगितले जात आहे. तरीही साठ जागांचा प्रस्ताव देऊन आपला अपमान केला आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे, तर खासदार संजय राऊत यांनी, भाजपची ताकद पाहता साठ जागा खूप झाल्या, असा टोला हाणला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील चर्चा थांबली आहे.

Web Title: shiv sena bjp bmc