'जे बोलतो, ते करुन दाखवितो' - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) वचननामा प्रसिद्ध करताना, 'जे बोलतो, ते करुन दाखवितो' असा नारा दिला. माझ्या वचननाम्या विरोधात बोलेल, तो मुंबईद्रोही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगाविला.

मुंबई - आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) वचननामा प्रसिद्ध करताना, 'जे बोलतो, ते करुन दाखवितो' असा नारा दिला. माझ्या वचननाम्या विरोधात बोलेल, तो मुंबईद्रोही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगाविला.

मुंबईत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी आज (सोमवार) शिवसेनेकडून वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मुंबईकर यावेळीही आमच्यावर विश्वास दाखवतील अशी आशा व्यक्त करत युतीबद्दलची बोलणी चालू आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महिनाभरात सर्व पालिकांवर भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना मुंबईसाठी काय करू शकते हे सांगण्यासाठी वचननामा प्रसिद्ध करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असल्याने आम्ही वचननामा आज प्रसिद्ध करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील अनेक रस्ते सिमेंटचे केल्यामुळे खड्डे कमी आहेत. राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये खड्ड्यांची समस्या आहे. वचननाम्यात युतीबद्दलचे वचन नाही युती झाल्यास त्यांचेही विषय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे - 
500 चौरस फुटांपर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ
700 चौरस फुट घरांना मालमत्ता करात सूट देणार
आरेचा आरक्षित हरितपट्टा कायम राहणार
मुंबईत पर्यटन केंद्र उभारणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार
उपनगरात वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार
देवनार डंपिंग ग्राउंड येथे कचरा विघटन प्रकल्प उभारणार
सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार
नव्याने रस्ते उभारणार
मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांनाही विमा कवच देणार
डबेवाल्यांसाठी डबेवाला भवन उभारणार
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे वाढविणार
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक साहित्य देणार
जेनेरिक मेडिसीन केंद्रे सुरु करणार
महापालिकेत शिक्षण घेतलेल्यांना महापालिका नोकऱ्यांमध्ये प्राधान्य
सर्व रेल्वे स्थानकांजवळ दुचाकी पार्किंग व्यवस्था उभारू
चार मोठे जलतरण उभारण्यात येणार
शाळकरी विद्यार्थ्यांना बेस्टचा मोफत पास देणार
बस, मेट्रो आणि रेल्वेसाठी एकच पास पद्धत लागू करू

Web Title: Shiv Sena chief Uddhav Thackeray declares manifesto