शिवसेनेसाठी न्यायालयात लढणार काँग्रेस नेता?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याने शिवसेना न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात येत असून, यासाठी शिवसेना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी काँग्रेस नेता न्यायालयात लढताना दिसणार आहे.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. पण, त्यापूर्वीच राष्ट्रपती राजवटीच्या तयारीला सुरवात झाली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनेने राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन करु न शकल्याने पक्षाकडून वाढीव मुदत मागण्यात आली होती. परंतु, ती मुदत राज्यपालांकडून नाकारण्यात आली असून या निर्णयाच्या विरोधातच शिवसेना न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फायटर संजय राऊतांनी रूग्णालयातून लिहिले संपादकीय!

शिवसेना राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन न करु शकल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आज रात्री साडेआठपर्यंत रात्रीवादीला मुदत देण्यात आली आहे. शिवसेनेनं तीन दिवसांची मुदत मागितली होती. पण, ती राज्यपालांनी दिली नाही. त्यामुळे शिवसेनेने न्यायालयात जाण्याचे ठरविले आहे. आता शिवसेनेची न्यायालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. शिवसेना नेते त्यांच्या संपर्कात आहेत.

काँग्रेसच्या कार्याध्यक्षांच्या 'या' ट्विटमुळे सत्तेचे गणित सुटणार हे स्पष्ट..

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena is in contact kapil sibal for appeal in supreme court against governor