पंतप्रधान तुमचा तर मुख्यमंत्री आमचा- शिवसेना

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरुच आहे. शिवसेना भाजपवर थेट टीका करत असली तरी मात्र पडद्याआड युतीची चर्चादेखिल सुरू असल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेनं नवी मागणी केली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री आमचा पंतप्रधान तुमचा अशी नवी मागणी केल्यामुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मुंबई- लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरुच आहे. शिवसेना भाजपवर थेट टीका करत असली तरी मात्र पडद्याआड युतीची चर्चादेखिल सुरू असल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेनं नवी मागणी केली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री आमचा पंतप्रधान तुमचा अशी नवी मागणी केल्यामुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. 'एनडीएनं 2019 मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावं,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे युतीच्या बोलणीत नवं वळण येऊ शकतं. 

त्याचबरोर, 'लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असेल, तर त्यासाठी 1995 मधील फॉर्म्युलाच हवा आहे. भाजपने यावर येत्या 48 तासांमध्ये निर्णय घ्यावा; अन्यथा आम्ही प्रचाराला सुरवात करू', असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. एकप्रकारे राऊत यांनी हा भाजपला अल्टीमेटमच दिला असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: shiv sena demands cm post brings new twist in alliance discussion with bjp