...आता पाकलाच व्यापले पाहिजे: उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्मीर बाबत मोदी सरकारने जो आज महत्वाचा निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.

मुंबई : काश्मीर हा आपल्या देशाचा प्रश्न असून, यामध्ये अमेरिकेसारख्या इतर देशांनी नाक खुपसण्याची गरज नाही. सरकारने आता पाकव्याप्त नव्हे तर पाकलाचा व्यापले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) दिली. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीर बाबतच्या निर्णयाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

'जम्मू-काश्मीर बाबत मोदी सरकारने जो आज महत्वाचा निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. या निर्णयासाठी मी नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे अभिनंदन करतो. देशात पोलादीपणा आहे, हे या निर्णयाने दाखवून दिले,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'आज खरया अर्थाने पूर्ण देश स्वतंत्र झाला. सर्व बेड्या निघाल्या आहेत. देशाच्या एकसंधपणासाठी राजकारण बाजूला ठेवावे. एवढ्या वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद आहे. मात्र, जे आदळआपट करतील, त्यांचा सरकार समाचार घेईल. काश्मीर हा सदैव आपल्या देशाचा भाग आहे, होता व राहिल. जे विरोध करतील, त्यांचा बंदोबस्त करण्यास सरकार समर्थ आहे,' असा इशारा ही उद्धव ठाकरे यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena leader uddhav thackeray welcomes scrapping of Article 370