शेतकऱ्यांना काय सांगायचं?: सेनेचे आमदार चिंताग्रस्त

ब्रह्मदेव चट्टे
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई : विधानसभेत आवाजी मतदानाने आज अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र शेकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच ठोक भूमिका घेतली नसल्याने सेनेच्या आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मतदार संघातील शेतकऱ्यांना काय सांगायचे? असा प्रश्न पडला असल्याचे सेनेच्या आमदाराने नाव छापण्याच्या अटीवर दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.

मुंबई : विधानसभेत आवाजी मतदानाने आज अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र शेकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच ठोक भूमिका घेतली नसल्याने सेनेच्या आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मतदार संघातील शेतकऱ्यांना काय सांगायचे? असा प्रश्न पडला असल्याचे सेनेच्या आमदाराने नाव छापण्याच्या अटीवर दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी दिल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही, या आपल्या भूमिकेवर शिवसेनेने घूमजाव केले. ही शिवसेनेच्या राजकारणातील सगळ्यात मोठी चूक ठरणार असल्याची भावना शिवसेनेच्या आमदारांमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. विरोधकांनी निलबंनाच्या मुद्द्यावर बहिष्कार टाकल्याने सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्प चर्चेविनाच आवाजी मतदानाने मंजूर केला. 

विधानसभेत आज अर्थसंकल्पाच्या चर्चेवेळी शिवसेनेला बोलू दिले नाही. शिवसेनेचे आमदार डाँ. जयप्रकाश मुंदडा व आमदार विजय औटी यांनी चर्चा करण्याची संधी मागितली. मात्र, तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी अर्थमंत्र्यांच्या निवेदनाने अर्थसंकल्प मंजूर केला असून विभागवार चर्चेच्या वेळी तुम्हाला बोलता येईल असे सांगितले. शिवसेनेला विश्वासात न घेताच भाजपने सभागृहामध्ये बहूमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजूर केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रंचड नाराजी आहे असे एका आमदाराने सांगितले. 

सेनेतच नाही सुसंवाद...
शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये सुसंवाद नसून मंत्री, आमदारांनी विश्वासात घेत नसल्याचा हा अणखी एक पुरावा असल्याचा दावाही या आमदारांनी केला आहे. राज्याच्या राजकारणात आक्रमक भूमिका घेणारी म्हणून शिवसेनेची ओळख आहे. मात्र कर्जमाफीच्या मुद्द्यावर धरसोड वृत्तीने पक्षाचे नुकसान होणार असल्याचेही या आमदाराने नमूद केले. 
संबंधित विषयाची तक्रार पक्षप्रमुखांकडे करणार का असे विचारले असता ते म्हणाले, "कितीवेळा तक्रार करणार? वरिष्टांकडून काहीच होत नसल्याची खंतही या आमदारांनी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात सर्व काही आलबेल नसून पक्षाच्या आमदारांमध्ये नेतृत्वाविषयी नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: shiv sena leaders worried over farmers loan waiver failure