ठाकरेंची शिवसेना होतेय हायटेक! पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार जनतेशी संवाद : ShivSena Podcast | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ShivSena Podcast

ShivSena Podcast: ठाकरेंची शिवसेना होतेय हायटेक! पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार जनतेशी संवाद

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता कात टाकण्याच्या तयारीत आहे. तरुणांना डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच शिवसेनाचा पॉडकास्ट स्वरुपात येत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी याची घोषणा केली आहे. (Shiv Sena Podcast Uddhav Thackeray Shiv Sena is becoming hi tech communicate)

आदित्य ठाकरेंनी याबाबत एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "लवकरच घेऊ येत आहोत, जनतेच्या मनातले प्रश्न आणि त्यांची थेट उत्तरं...'शिवसेना पॉडकास्ट' स्वरुपात! 'आवाज कुणाचा' शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत युट्यूब पेजवर" (Latest Maharashtra News)

अर्थात 'आवाज महाराष्ट्रा'चा असं या पॉडकास्टचं नाव असून यामध्ये शिवसेनेची अधिकृत भूमिका आणि विविध राजकीय विषयांवर चर्चांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः तरुणांमध्ये सध्या पॉडकास्ट हा प्रकार लोकप्रिय असल्यानं याच तरुण वर्गाला आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, हे पॉडकास्ट कधीपासून सुरु होणार याबाबत मात्र अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण ज्या युट्यूब चॅनेलवरुन हे पॉडकास्ट प्रसारित होणार आहे. त्या ShivSena UBT चॅनेलवर सध्या शिवसेनेनं २०१९ मध्ये आलेलं 'शिवसेना गीत' अपलोड करण्यात आलं आहे.