उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता! Shiv Sena Political Crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan explains Supreme Court verdict on Maharashtra political crisis Eknath shinde Uddhav Thackeray

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर पूर्वस्थिती लागू करण्याचे निर्देश दिले असते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नोंदवलं आहे.

Shiv Sena Political Crisis : उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता!

कऱ्हाड : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं. त्यांनी विधिमंडळात जाऊन अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्यासारखं भाषण करुन आपली बाजू मांडायला हवी होती. त्याची नोंद विधिमंडळाच्या कामकाजात होवून त्यांचं भाषण रेकॉर्डवर राहिलं असतं, असं मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर माध्यमांपुढं मांडलं होतं.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) काल निकाल देताना नेमके हे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळं आमदार चव्हाणांचं निरीक्षण खरं ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रात राजकीय पटलावर वेगळ्याच घडामोडी होवून मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. या सत्तासंघर्षाबद्दलचा महत्वाचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयानं दिला.

त्यात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर पूर्वस्थिती लागू करण्याचे निर्देश दिले असते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर हीच भूमिका माध्यमांपुढं मांडली होती. ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं. घाईघाईत राजीनामा देऊन त्यांनी मोठी चूक केली आहे.

त्यांनी विधिमंडळात जाऊन भाषण करायला हवं होतं. आपली बाजू मांडायला हवी होती. ठाकरेंनी त्यांच्यापुढची परिस्थिती सदनात मांडली असती, तर त्याची नोंद विधिमंडळाच्या कामकाजात झाली असती. त्यांचं भाषण रेकॉर्डवर राहिलं असतं, अशी प्रतिक्रिया आमदार चव्हाण यांनी उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. सर्वोच्च न्यायालयानं काल निकाल देताना यातील मुद्दे मांडले आहेत. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांचं मत खरं ठरल्याची चर्चा सध्या सुरु आहेत.