विक्रीकर निरीक्षक परीक्षेत जाकापुरे राज्यात प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी बालाजी जाकापुरे याचा राज्यात प्रथम क्रमांक आला. ठाण्यातील प्रमोद त्र्यंबक केदार याने मागासवर्गातून, तर सांगली जिल्ह्यातील शीतल अंबाण्णा बंडगर हिने महिलांमधून पहिला क्रमांक मिळविला. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 7 जानेवारी 2018 रोजी 251 पदांसाठी घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या पदांसाठी संयुक्त (पूर्व) परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी तीन लाख 30 हजार 909 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यातून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी चार हजार 430 उमेदवार पात्र ठरले होते, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव विजया पडते यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 

शिफारशीमध्ये पात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणपडताळणीसाठी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या तारखेपासून दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्‍यक असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Shivaji Jakapure stands first in STI exam in Maharashtra