शिव स्मारकासाठी तरतूद कशी करणार? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित सागरी स्मारकासाठी आवश्‍यक असलेल्या हजारो कोटी रुपयांची तरतूद कशी करणार आहात, याचा लेखी तपशील देण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित सागरी स्मारकासाठी आवश्‍यक असलेल्या हजारो कोटी रुपयांची तरतूद कशी करणार आहात, याचा लेखी तपशील देण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सुमारे 3600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्मारक बांधण्याऐवजी राज्याला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी निधी खर्च करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सनदी लेखापाल मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्या. मंजुला चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने स्मारकाबाबत याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण तीन आठवड्यांत करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. सरकारी तिजोरीत खडखडाट आहे आणि सरकारवर कोट्यवधींचे कर्ज आहे. त्यामुळे स्मारकावर खर्च न करता शिक्षण, कुपोषण, महिला विकासासाठी योजना करावी, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला सुमारे 72 कोटी खर्च आला, असेही याचिकेत म्हटले आहे. 

Web Title: shivaji maharaj monument