राष्ट्रवादी सोडणारे शिवेंद्रराजे उदयनराजेंबद्दल म्हणाले...

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

'उदयनराजे हे मोठे बंधू आहेत. ते भविष्यातही माझ्यासोबत कायम राहतील. उदयनराजेंसोबत कोणताही वाद नाही'.

- शिवेंद्रराजे भोसले

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज (मंगळवार) दिला. त्यानंतर त्यांनी आता खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, 'उदयनराजे हे मोठे बंधू आहेत. ते भविष्यातही माझ्यासोबत कायम राहतील. उदयनराजेंसोबत कोणताही वाद नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह कमी झाल्याचे चित्र आहे. सत्तेपासून दूर राहता येत नाही. आरक्षणाच्या निर्णयामुळे तरूण मराठा समाज भाजपसोबत आहे, अशा शब्दांत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच शिवेंद्रराजे यांचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांच्यासोबत असलेले मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. आमदारकीचा राजीनामा देताना शिवेंद्रराजे यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत सर्व वादावर पडदा टाकला. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन तर काँग्रेसचा एक आमदार उद्या (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशी माहिती मिळत आहे. यामध्ये शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक, वैभव पिचड या राष्ट्रवादीच्या आमदारांसह काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendra Raje Bhosale statement about MP Udayanraje Bhosale