काँग्रेसचा दिल्लीच्या गल्लीतील मीना बाजार झाला : शिवसेना

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

काँग्रेसच्या ऱ्हासाला मोदी, शहा जबाबदार नसून ते स्वतःच जबाबदार आहेत. वर्षांच्या सोनियांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेसुरले सत्त्वही गमावले आहे. 73 वर्षांच्या सोनिया गांधी यांना पुन्हा काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी पुढे यावे लागले. सोनिया गांधी वारंवार आजारी पडतात. उपचारांसाठी त्यांना परदेशात जावे लागते.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभव होऊनही आम्हीच देशाचे राज्यकर्ते या मोगली मानसिकतेतून काँग्रेस पक्ष बाहेर पडायला तयार नाही. देश कलम 370 हटवल्याचे स्वागत करीत असताना जीर्णशीर्ण काँग्रेस पक्ष जळमटे आपल्या अंगावरून दूर करायला तयार नाही. त्यामुळे काँगेसचा दिल्लीच्या एका गल्लीतील मीना बाजार झाला आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर देशभरातून त्याचे स्वागत करण्यात येत आहे. काँग्रेसने याला विरोध केला आहे. याच मुदद्यावरून शिवसेनेने टीका केली आहे. सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून शिवसेनेने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की काँग्रेसच्या ऱ्हासाला मोदी, शहा जबाबदार नसून ते स्वतःच जबाबदार आहेत. वर्षांच्या सोनियांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेसुरले सत्त्वही गमावले आहे. 73 वर्षांच्या सोनिया गांधी यांना पुन्हा काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी पुढे यावे लागले. सोनिया गांधी वारंवार आजारी पडतात. उपचारांसाठी त्यांना परदेशात जावे लागते. अधूनमधून त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याच्या बातम्या येत असतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेतृत्व करण्याचे ओझे त्यांना वाहावे लागणे हे अमानुष आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन 75 दिवस झाले. काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार नवीन अध्यक्ष निवडा असे राहुल गांधींचे म्हणणे होते. अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा असावा असेही त्यांचे सांगणे होते.

सारा देश ‘370’ कलम हटवल्याचे स्वागत करीत असताना जीर्णशीर्ण काँग्रेस पक्ष ‘370’ची जळमटे आपल्या अंगावरून दूर करायला तयार नाही. त्यांच्या पक्षातच यावर दोन तट पडले आहेत. ट्रिपल तलाकच्या बाबतीत राजीव गांधी यांनी केलेली घोडचूक यावेळी सुधारता आली असती, पण काँग्रेसने इतिहासातील चुकांपासून शिकण्याची तयारी दाखवली नाही. त्यामुळे काँगेसचा दिल्लीच्या एका गल्लीतील मीना बाजार झाला आहे. जुनी गिऱ्हाईके तिथे वावरताना दिसतात इतकेच. काँग्रेसच्या ऱ्हासाला मोदी-शहा जबाबदार नसून ते स्वतःच जबाबदार आहेत. 73 वर्षांच्या सोनियांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेसुरले सत्त्वही गमावले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena attacks Congress on article 370