Video : मुख्यमंत्री सेनेचाच होणार; भाजपविरोधात शिवसेनेची बॅनरबाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

भाजपच्या सरचिटणीस सरोज पांडे नाशिक दौऱ्यावर आल्या असता निवडणूक युती म्हणून होईल. मात्र, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने बॅनरबाजी केली आहे. भाजप आणि सेनेत मुख्यमंत्री कुणाचा यावरून सुरु असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.

नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचाच या केलेल्या दाव्यावर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे बॅनर लावून भाजपचे कान टोचले आहेत.

 

भाजपच्या सरचिटणीस सरोज पांडे नाशिक दौऱ्यावर आल्या असता निवडणूक युती म्हणून होईल. मात्र, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने बॅनरबाजी केली आहे. भाजप आणि सेनेत मुख्यमंत्री कुणाचा यावरून सुरु असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री सेनेचाच होणार, असे होर्डिंग शहरभर लावून भाजपचे कान टोचले. भाजप कार्यलयाबाहेर सुद्धा फलक लावण्यात आले आहे. भाजप प्रभारी सरोज पांडे यांच्या वक्तव्या नंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.

भाजपच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी कोणाचा कल्पनाविलास काहीही असला तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बांधणी व सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी पांडे नाशिकमध्ये आल्या होत्या. यावेळी पांडे म्हणाल्या, 'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचीच सत्ता राज्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena banner against BJP CM post claim in Nashik