आधी गळाभेट मग टोलेबाजी; दानवे व सत्तार भेटीनंतर मंत्र्यांची वेगळी भूमिका

शिवसेना व भाजप यांच्यात पुन्हा युती होण्याची चावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे
दानवे व सत्तार भेट
दानवे व सत्तार भेटSakal

नवी दिल्ली : शिवसेना व भाजप यांच्यात पुन्हा युती होण्याची चावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे आहे, असे सूचक वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी बुधवारी दिल्लीत गळाभेट घेतली. त्यामुळे नव्याने राजकीय चर्चा सुरू झाली. या भेटीनंतर दानवे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल घेतलेल्या शिवसेनेच्या बैठकीबाबत - मुख्य खुर्चीवर कोण बसले होते, असा टोला लगावताना मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दिल्ली दौऱ्यावर असलेले सत्तार त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. दानवे यांच्याशी औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यासाठी चर्चा केल्याचे सत्तार यांनी सांगितले. जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू व्हावी म्हणूनही दानवे यांना विनंती केली असल्याचे ते म्हणाले. असे असले तरी गडकरी यांची भेट घेतल्यावर सत्तार २४ तासांच्या आत रेल्वेच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालया ऐवजी केंद्रीय मंत्री दानवे यांच्यासारख्या राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्याच्या निवासस्थानी जातात. तेथे दोघे जुने मित्र गळाभेट घेतात व नंतर परस्परांच्या राजकीय भूमिकांना अनुसरून राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरवात होते हा घटनाक्रम सूचक मानला जात आहे.

दानवे व सत्तार भेट
भुईबावड्यात तीन मंदिरे फोडली; घंटासह हजारोंच्या वस्तू लंपास

दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कालच्या पक्षांतर्गत बैठकीबद्दलच शंका उपस्थित करून त्यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेली कुजबूज वाढविली आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक नेमकी कुठे घेतली, बैठकीला कोण कोण होते आणि मुख्य खुर्चीवर कोण बसले होते, याचा शोध लावला पाहिजे असे दानवे म्हणाले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले नसले तरी राज्य व्यवस्थित सुरू आहे. कारण सध्या राज्याच्या राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे, असा टोला त्यांनी लगावला. राज्याचे मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य चांगले चालले असेल तर याचे श्रेय सरकारचे नसून शांत, संयमी आणि सहनशील जनतेचे आहे असेही दानवे म्हणाले.

पक्षप्रमुखांचा आदेश

‘‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे शिवसेनेचे पक्ष प्रमुखही आहेत. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या पक्षात कशी पद्धत आहे माहिती नाही, पण पण शिवसेनेत एकदा पक्षप्रमुखांनी आदेश दिला की आम्ही सर्व शिवसैनिक निवडणुकीला तयार असतो, असा टोला सत्तार यांनी दानवे यांच्या या टोलेबाजीला प्रत्युत्तर देताना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com