पहारेकरीच चोऱ्या करायला लागले- उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पहारेकरीच चोऱ्या करायला लागल्यावर कसं होणार असे म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल कराराच्या मुद्यावरून निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभेच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये बोलत होते.

पंढरपूर- पहारेकरीच चोऱ्या करायला लागल्यावर कसं होणार असे म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल कराराच्या मुद्यावरून निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभेच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एक समज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरवला गेला होता की, ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत आमचेच राज्य आहे. हा समज या पाच राज्यांच्या निकालांनी खोटा ठरवाला आहे. राष्ट्रीय पक्षांची मस्ती दिल्लीत चालेल मात्र माझ्या घरात चालू देणार नाही. अयोध्येत मी कुंभकरणाला जागं करण्यासाठी गेलो होतो. आणि पंढरपुरातही याचसाठी मी आलो असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

विठ्ठलाच्या साक्षीने धनगर आणि इतर समाजाच्या बांधवांना वचन देतो की, कोळी महादेव कोळी असतील त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणार. शिवसेना आपलं वचन कधीही मोडत नाही, हे ध्यानात ठेवा असेही त्यांनी यावेळी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेच्या महासभेचे आज पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे युतीबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, राम मंदिराच्या मुद्द्यावरुन अयोध्येत जाऊन आल्यानंतर आता उद्धव ठाकरे वारकऱ्यांना साद घालत आहेत.

दरम्यान, पंढरपुरात आगमन होताच त्यांनी पत्नी रश्मी, मुलगा आदित्य यांच्यासह श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. सभेसाठी लाखोंच्या संख्येने राज्यभरातून शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे सर्व मंत्री पंढरपूर मध्ये आले आहेत. श्री विठ्ठल नामाच्या गजरात शिवसैनिकांनी दिलेल्या जय श्रीराम पहले मंदिर फिर सरकार, उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी पंढरी दुमदुमून गेली आहे.

Web Title: Shivsena Chief Uddhav Thackerary Live At Pandharpur