शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूरमध्ये दाखल

अभय जोशी
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभेच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. पंढरपुरात आगमन होताच त्यांनी पत्नी रश्मी, मुलगा आदित्य यांच्यासह श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. सभेसाठी लाखोंच्या संख्येने राज्यभरातून शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे सर्व मंत्री पंढरपूर मध्ये आले आहेत. श्री विठ्ठल नामाच्या गजरात शिवसैनिकांनी दिलेल्या जय श्रीराम पहले मंदिर फिर सरकार, उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी पंढरी दुमदुमून गेली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांच्या महासभेसाठी आलेल्या लाखो शिवसेना कार्यकर्त्यांमुळे पंढरीतील सर्व हॉटेल, लॉज, धर्मशाळा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. आज (सोमवार) पहाटेपासूनच चंद्रभागा नदी किनाऱ्यावर या कार्यकर्त्यांनी स्नानासाठी गर्दी केली होती. जागोजागी उभा करण्यात आलेल्या स्वागत कमानी आणि भगव्या झेंड्या मुळे सारी पंढरी भगवी झाली आहे. ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी राज्यभरातून आलेल्या पुरुष कार्यकर्त्यांप्रमाणे महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. थोड्याच वेळात श्री ठाकरे हे चंद्रभागा बसस्थानकाच्या मैदानावर महासभेसाठी पोहोचणार आहेत.

महत्त्वाचे मुद्देः

  • सभेसाठी झालेल्या गर्दीमुळे पंढरीला आले यात्रेचे स्वरूप
  • श्री विठ्ठलाच्या पंढरीत श्रीरामाचा गजर
  • स्वागत कमानी आणि भगव्या झेंड्या मुळे अवघी पंढरी झाली भगवी
  • गर्दीमुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागत आहेत पाच तास
  • महा सभेनंतर सायंकाळी सात वाजता श्री ठाकरे यांच्या हस्ते होणार चंद्रभागेची आरती
Web Title: Shivsena chief Uddhav Thackerary at Pandharpur