उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधाण

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 28 मार्च 2018

महाराष्ट्रात सरकारमध्ये शिवसेना सहभागी असून आमच्या आमदारांना निधी उपलब्ध करुन द्यावा, या ही एका महत्त्वपूर्ण मागणीसाठी ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते. शिवसेना-भाजप यांच्या राजकीय संबंधात काहीसा ताण असतानाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे परस्परांशी बरे संबंध आहेत.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. नेमकी कशासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे, हे अधिकृतपणे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी या भेटीमागे काही कयास लावले जात आहेत. ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेची तिसऱ्या आघाडीसाठी मनधरणी सुरु केली असताना या काहिशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेतील अशी चर्चा आहे.

महाराष्ट्रात सरकारमध्ये शिवसेना सहभागी असून आमच्या आमदारांना निधी उपलब्ध करुन द्यावा, या ही एका महत्त्वपूर्ण मागणीसाठी ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते. शिवसेना-भाजप यांच्या राजकीय संबंधात काहीसा ताण असतानाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे परस्परांशी बरे संबंध आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची उद्धव ठाकरे यांच्या वतीने भेट घेतली असताना आज 63 आमदारांसाठी निधीची मागणी करणारी पत्र घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतील. 

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि माहिती व बालकल्याण या खात्यांनी आम्हाला रक्कम द्यावी अशी शिवसेना आमदारांची मागणी आहे. गेले काही दिवस उद्धव ठाकरे यांना असे आमदार मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ही पत्रे घेऊन ठाकरे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या गावी जाणार असल्याचे समजते. शिवसेनेला जे काही आक्षेप आहेत ते महाराष्ट्रात तरी चौकटीतच सोडवण्यावर शिवसेनेचा भर दिसत आहे. अर्थसंकल्पालाही आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे नवनियुक्त सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह हजेरी लावली होती.

Web Title: ShivSena chief Uddhav Thackeray meet CM Davendra Fadnavis