शपथविधीला उद्धव ठाकरेंची गैरहजेरी

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा खासदारांसह आज अयोध्येत असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या वेळी उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे 18 खासदारही उपस्थित होते. या सर्वांनी रामजन्मभूमिस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्याच वेळी म्हणजेच आज सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजर होते. 

आज सकाळी उद्धव ठाकरे खासदारांसह अयोध्येत पोहचले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसेना खासदार संजय राऊत अगोदरच अयोध्येत पोचले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com