शेतकऱ्यांच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

पीकविमा कंपन्या या शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याने याविरोधात शिवसेनेने मुंबईतील वीमा कंपन्यांच्या कार्यालयांबाहेर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. एशिअन हार्ट इन्स्टिट्यूटपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून बीकेसी परिसरातील भारती एक्सा या वीमा कंपनीसमोर या मोर्चाची सांगता झाली.

मुंबई : शेतकऱ्यांना हक्क मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. आमच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत. आम्ही ज्यांनी पिकविलेले अन्न खात आहे, त्यासाठी आम्ही जागतोय. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी बांधील आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
पीकविमा कंपन्या या शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याने याविरोधात शिवसेनेने मुंबईतील वीमा कंपन्यांच्या कार्यालयांबाहेर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. एशिअन हार्ट इन्स्टिट्यूटपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून बीकेसी परिसरातील भारती एक्सा या वीमा कंपनीसमोर या मोर्चाची सांगता झाली. शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले होते.

शिवसेनेचा हा मोर्चा शेतकऱ्यांचा मोर्चा नसून शेतकऱ्यांसाठी असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना देताना वीमा कंपन्यांकडून त्यांना त्रास दिला जातो. याचे नियम शेतकऱ्यांना विचारुन तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची यामध्ये पिळवणूक होते. हे सर्व बदलले जावे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जर या मोर्चाचा अर्थ पीकविमा कंपन्यांना कळत नसेल तर त्यांना यानंतर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशाराही शिवसेनेकडून या वीमा कंपन्यांना देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray to protest against insurance companies