शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित; पण अद्याप परवानगीच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित; पण अद्याप परवानगीच नाही

शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित; पण अद्याप परवानगीच नाही

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मान्यता दिली नसली तरी शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित केले असल्याचे दिसून आले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह ‘आतुरता उध्दवसाहेबांच्या गर्जनेची’ असे ते पोस्टर सोशल मिडियावर झळकले आहे.

सत्तांतर झाल्यानंतर होणाऱ्या या मेळाव्यात विरोधीपक्ष भाजप आणि विशेषत: शिंदे गटावर तोफ डागली जाणार सर्वश्रृत आहे. आता फक्त उद्धव ठाकरे कोणत्या पद्धतीने बोलणार, कोणते शब्द वापरणार, हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी जागेचा प्रश्न असताना, मात्र शिवसेनेने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे. शाखाप्रमुख तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचा मेळावाही पुढील आठवडय़ात संपन्न होणार असून राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

काहीही झाले, तरी मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठीचे पोस्टर जाहीर करण्यात आले आहे. या मेळाव्यातून ठाकरे हे भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे गटाला लक्ष्य करणार असून शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.

Web Title: Shivsena Chief Uddhav Thackeray Shivsena Display Poster For Dussehra Rally Despite Bmc Not Yet Approved

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..