'महाविकासआघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

महाविकासआघाडी संधीसाधू आघाडी

- शिवसेनेच्या विचारांशी काँग्रेस सहमत नसेल

मुंबई : राज्यात सरकार स्थापनेवरून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आता महाविकासआघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या महाविकासआघाडीकडून सरकार स्थापन केले जाण्याची शक्यता आहे. असे असताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केले. महाविकासआघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका गडकरी यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महाविकासआघाडीच्या सरकारबाबत नितीन गडकरी म्हणाले, राज्यातील नवे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थिर राहणार नाही. हे सरकार महाराष्ट्राच्या भल्याचे नाही. अस्थिर सरकार आल्यास महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान होईल. भाजप-शिवसेना युती हिंदुत्त्वाच्या विचारधारेवर आधारित होती. आजही आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. मात्र, अशी युती तोडणे म्हणजे केवळ देशाचेच नव्हे तर हिंदुत्त्व आणि महाराष्ट्राचे नुकसान आहे. 

महाविकासआघाडी संधीसाधू आघाडी

महाविकासआघाडी ही एक सत्तेसाठी बनवलेली संधीसाधू आघाडी आहे. याचबरोबर, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही.

मुख्य बातम्या

शिवसेनेच्या विचारांशी काँग्रेस सहमत नसेल

शिवसेनेच्या विचारांशी काँग्रेस कधीही सहमत नव्हती आणि नसेल. त्याचबरोबर काँग्रेस ज्या विचारांवर बनलेला पक्ष आहे, ते विचार शिवसेनेला मान्य नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Congress NCP Government will no stay longer than 8 months longer says Nitin Gadkari