महाशिवआघाडीची बैठक संपली; सरकार स्थापनेवर...

टीम ई-सकाळ
Thursday, 14 November 2019

- महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेतेमंडळींकडून चर्चा आणि बैठकांचे आयोजन केले जात आहे. 

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेतेमंडळींकडून चर्चा आणि बैठकांचे आयोजन केले जात आहे. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून महाशिवआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. मात्र, या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली. याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, अद्यापही राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. असे असताना आज मुंबईतील एमईटी संस्थेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीला जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, माणिकराव ठाकरे, नवाब मलिक आणि विजय वडेट्टीवार हजेरी लावली. 

बाळासाहेबांची शपथ घेऊन, सांगतो हे ठरलं होतं : संजय राऊत 

दरम्यान, या सर्व नेत्यांच्या बैठकीत कोणता निर्णय झाला, याबाबत कोणत्याही नेत्याने माहिती दिली नाही. मात्र, किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. 

Image may contain: 6 people, people smiling, people sitting, table and indoor

बैठकीत आले सगळ्यांचे जाहीरनामे 

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक होताना नेत्यांच्या हातात एकमेकांचे जाहीरनामे दिसत होते. काँग्रेस आघाडीने संयुक्त जाहीरनामा केला असला तरी, शिवसेनेच्या जाहीरनाम्यात काय काय होतं हे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी अगदी बारकाईने पाहिलं. त्याचवेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी देखील आघाडीचा जाहीरनामा पूर्णपणे वाचला.

बच्चू कडू ताब्यात, राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही? 

राज्यात तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असताना तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रम ठरवावा, असं काँग्रेस-राष्ट्रवादीचं मत आहे. त्यासाठीच ही बैठक होत. सरकारचा अजेंड ठरवण्याबरोबरच खाते वाटप तसेच वेगवेगळे विभाग कसे चालतील, यावरही नेत्यांमध्ये चर्चा होत असून, त्यानंतरचा सरकार स्थापनेचा विषय पुढे सरकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Congress NCP Leaders meeting has finished