बळीराजाचे नव्हे; बळी घेणाऱ्यांचे राज्य : शिवसेना

बळीराजाचे नव्हे; बळी घेणाऱ्यांचे राज्य : शिवसेना
बळीराजाचे नव्हे; बळी घेणाऱ्यांचे राज्य : शिवसेना

मुंबई - राज्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारला जबाबदार ठरवत हे बळीराजाचे राज्य नव्हे तर शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्यांचे राज्य असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

"सामना'तील अग्रलेखाद्वारे सेनेने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, "मान्सून चांगला होऊनही राज्यातील शेतकऱ्यांची परवड थांबलेली नाही. सरकार बदलले असले तरी बळीराजाचे रुसलेले नशीब बदललेले नाही. तेव्हा सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चुकीच्या सरकारी धोरणांने केलेल्या "हत्या'च आहेत, असे कुणी म्हटले तर सत्ताधाऱ्यांकडे त्याचे काय उत्तर आहे? कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा करायचा नाही आणि दुसरीकडे वरुणकृपेने फुललेल्या शेतमळ्यातील पीक कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणायची. हे बळीराजाचे राज्य नव्हे. हे तर शेतकऱ्यांचे "बळी'" घेणाऱ्यांचे राज्य म्हणावे लागेल!'

मराठवाड्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत अग्रलेखात भाष्य केले आहे. अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, "मराठवाड्यात तर दर दिवशी दोन शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळावे लागत आहे. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा केंद्रबिंदू मराठवाडा झाला आहे. यंदाचा पावसाळा वगळता मागील पाच-सहा वर्षे मराठवाड्याने सलग दुष्काळाचे तडाखे सहन केले. या वर्षी मान्सून चांगला होऊनही या परिस्थितीत फरक पडलेला नाही. मराठवाड्यावर "अस्मानी'ची कृपा झाली तरी "सुलतानी'ची अवकृपा कायमच आहे. राज्यातील भाजप सरकार जलसिंचनासह अनेक कामांच्या गमजा नेहमीच मारीत असते. आताही जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्या पक्षाने त्या विषयी स्व-कौतुकाचे ढोल यथेच्छ पिटले, पण मग तरीही मराठवाड्यात दिवसाला दोन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ का आली, या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारलाच द्यावे लागेल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com