शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना सावध, पदाधिकाऱ्यांकडून घेणार निष्ठेचं प्रतिज्ञापत्र | Shivsena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena demands affidavit from shivsainik stating their belief on uddhav thackeray and party

शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना सावध, पदाधिकाऱ्यांकडून घेणार निष्ठेचं प्रतिज्ञापत्र

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेचे ३९ आमदार फोडले यानंतर शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं यासोबतच शिवसेना पक्षालाही मोठी किंमत चुकवावी लागत आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपसोबत मिळून महाराष्ट्रात सत्ता देखील स्थापन केली आहे. दरम्यान बंडानंतर सावध झालेल्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडे मागितले आहे. (shivsena demands affidavit from shivsainik stating their belief on uddhav thackeray and party)

शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेवर निष्ठा असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येत आहे. शाखाप्रमुक ते आमदार असे सर्व नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून लिहून घेण्यात येत आहे. शिवसेनेवर असलेल्या निष्ठा दाखवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात येत आहे. बंडखोर आमदारांना शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यतेपोटी सावधगिरी म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर एकनिष्ठ राहिलेल्या आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख तसेच इतर अन्य पदाधिकाऱ्यांकडून देखील या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे.

हेही वाचा: मोठी कारवाई! अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान जेरबंद

सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर माझा विश्वास आहे. तसेच आपली निष्ठा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि पक्षावर असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रतिज्ञापत्राखाली स्वत:ची सही आणि शिवसेनेतील पद याचा उल्लेख करण्यास सांगण्यात आल्याची देखील माहिती आहे.

हे प्रतिज्ञापत्र पक्ष कार्यालयात दाखल करावे लागणार आहे. दरम्यान माजी पदाधिकाऱ्यांकडून आम्ही असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाण्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. पक्षाचा आदेश असल्याने सर्व शिवसैनिकांना हा आदेश पाळावा लागणार आहे.

हेही वाचा: एक महिना वैधता असलेले सर्व कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन, पाहा संपूर्ण यादी

Web Title: Shivsena Demands Affidavit From Shivsainik Stating Their Belief On Uddhav Thackeray And Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..